Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन...

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन…

सिंधुदुर्गनगरी,ता.१३: येत्या २४ तासात ते १७ ऑक्टोबर २०२० रोजीपर्यंत किनारपट्टीवर ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिली असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरी त्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.
१४ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह विजा चमकण्याची तसेच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची तसेच तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. १६ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १७ ऑक्टोबर २०२० रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी त्या अनुषंगाने नागरिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी अश्रय घ्यावा. विजेच्या खांबापासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली अश्रयास थांबू नये, विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे, धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
कोणताही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष ०२३६२-२२८८४७/१०७७ आणि जिल्हा पोलीस नियंत्रणकक्ष – ०२३६२-२२८६१४, मालवण तहसिल नियंत्रण कक्ष – ०२३६५-२५२०४५, देवगड तहसिल नियंत्रण कक्ष – ०२३६४-२६२२०४, वेंगुर्ला तहसिल नियंत्रण कक्ष – ०२३६६-२६२०५६, दोडामार्ग तहसिल नियंत्रण कक्ष – ०२३६३-२६२२०४, सावंतवाडी तहसिल नियंत्रण कक्ष – ०२३६३-२७२०२८, कुडाळ तहसिल नियंत्रण कक्ष – ०२३६२-२२२५२५, कणकवली तहसिल नियंत्रण कक्ष – ०२३६७-२३२०२५, वैभववाडी तहसिल नियंत्रण कक्ष – ०२३६७-२३७२३९ येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कक्षातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments