Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांदा तपासणी नाक्याची जमिन संपादित करताना शेतकऱ्यांची कोट्यावधीची फसवणूक...

बांदा तपासणी नाक्याची जमिन संपादित करताना शेतकऱ्यांची कोट्यावधीची फसवणूक…

साई कल्याणकरांचा आरोप; नुकसान भरपाई मिळण्यासाठी ११९ शेतकरी न्यायालयात मागणार दाद…

सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.१३: बांदा तपासणी नाका उभारण्यासाठी घेण्यात आलेल्या ३२ एकर जमिनीत आपल्यासह तब्बल ११९ शेतकर्‍यांची तत्कालीन प्रांताधिकारी व आरटीओ अधिकार्‍यांकडुन फसवणूक झाली,असा आरोप येथिल सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी केला आहे.त्या ठीकाणी खनिजयुक्त माती असल्यामुळे त्या जागेची शासकीय कींमत १३० कोटी ९० लाख रुपये होते.मात्र त्या जागेपोटी फक्त चार कोटी ३१ लाख रुपये देवून शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली.त्यामुळे या विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहे,असा इशारा त्यांनी दिला आहे.
या प्रकरणात १८ अधिकार्‍यांच्या विरोधात मोक्का न्यायालयात धाव घेतल्यानतर श्री. कल्याणकर यांनी माहीती अधिकाराच्या माध्यमातून ही माहीती मिळविली आहे. तसेच या प्रकरणात तत्कालीन अधिकार्‍यांनी आपल्यासह अन्य शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे .याबाबत त्यांनी माहीती दिली ते म्हणाले संबधित नाक्यासाठी आवश्यक असलेली ३२ एकर जागा संपादित करण्यात आली.शासकीय नियमांनुसार अशा प्रकारची जागा संपादित करताना त्या ठीकाणी असलेल्या घर,झाडे,खनिज संपत्ती अशा गोष्टीचे मुल्यांकन होणे गरजेचे होते.मात्र घर आणि झाडांचेच मूल्यांकन झाले.खनिजाचे मुल्यांकन केले नाही. संबधित अधिकार्‍यांनी त्या ठीकाणी खनिज असलेले मान्य केले तसेच त्याची रॉयल्टी भरली परंतू शेतकर्‍यांना भरपाई देताना मात्र ते विचारात घेतले नाही.तर फक्त चार कोटी ३१ लाख रुपये देवून आमची बोळवण केली आहे .हा सर्व प्रकार म्हणजे शेतकर्‍यांची शुध्द शासकीय कार्यालयाकडुन झालेली फसवणूक आहे. त्यामुळे आमची जमिन घेतल्यामुळे आता फरकाची रक्कम शेतकर्‍यांना संबधित अधिकार्‍यांना द्यावी,तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा,अन्यथा आम्ही या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहे.असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात त्यांनी नागपुर येथिल न्यायालयाचा सारांश जोडला असून त्या आधारे आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments