सावंतवाडी मनसेची मागणी; तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन…
सावंतवाडी,ता.१३: अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे तात्काळ पंचनामे करा,अशी मागणी आज मनसेच्या वतीने तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे करण्यात आली.याबाबत त्यांनी श्री.म्हात्रे यांना निवेदन दिले.
त्यात असे म्हटले आहे की,आत्ता पुन्हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या वादळी व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील सरासरी ७० टक्के भातशेती पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे,काही भागांत हि नुकसानी ९० टक्के पर्यंत पोहोचली आहे.येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत योग्य ते पंचनामे करून भरपाई द्यावी,भाताच्या लोंब्या चिखलात आडव्या पडल्यामुळे शेतातच या धान्यास कोंब फुटले आहेत.शेतीच्या बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे.तसेच काही गावात भात खाचरांमध्ये डोंगरांतील माती,झाड-झाडोरा वाहून आला आहे.कापणी झाली तरी,भात सुकवायला जागा नाही,अशी परिस्थिती आहे.पुढच्या वर्षी गुरांच्या वैरणीचा प्रश्न उद्भवणार आहे.