वैभववाडी,ता.१४: ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जळगाव जिल्हा-नाशिक विभाग आयोजित आॕनलाईन राज्यस्तरीय अभ्यासवर्गाचे आयोजन १५ ते २२ आॕक्टोबर या कालावधीत फेसबुक आणि यूट्यूब च्या माध्यमातून आॕनलाईन करण्यात आले आहे. तरी राज्यातील सर्व नागरिकांनी, ग्राहकांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्यातील सर्व ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या विभाग, जिल्हा व तालुकाध्यक्ष यांनी केले आहे.
सात दिवस चालणारा हा अभ्यासवर्ग १५ ते २२ रोजी पर्यंत रोज दुपारी ४.ते ५.३० या वेळेत फेसबुक व युट्युबवर आॕनलाईन पध्दतीने ग्राहकांच्या जिव्हाळ्याच्या विविध विषयांवर राज्यातील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. तरी याचा लाभ घ्यावा,असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग व सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. विजयजी लाड (राज्याध्यक्ष-ग्राहक पंचायत महाराष्ट्र) हे भूषवणiर असून, अभ्यासवर्गाचे उद्घाटक साहित्यिक मा. प्रा. बाबासाहेब मार्तंड जोशी (नाशिक विभागीय अध्यक्ष) हे करणार असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री. श्यामकांतजी पात्रीकर (अध्यक्ष- विदर्भ प्रांत, ग्राहक पंचायत महाराष्ट्र), प्रा. एस. एन. पाटील (अध्यक्ष- कोकण विभाग, ग्राहक पंचायत महाराष्ट्र) श्री. प्रमोद कुलकर्णी (अध्यक्ष- मराठवाडा विभाग, ग्राहक पंचायात महाराष्ट्र) हे असतील. तर वक्ते म्हणून श्री.सर्जेरावजी जाधव, (पुणे राज्य संघटक) श्री.अनिल जोशी (पुणे प्रमुख ग्राहक मार्गदर्शन केंद्र ) सौ. मेधाताई कुलकर्णी (उस्मनाबाद राज्य सहसंघटक) श्री.अरुण वाघमारे (मावळ, पुणे राज्य सचिव), डॉ. योगेश सूर्यवंशी (धुळे सहसंघटक नाशिक विभाग), श्री. अरुण भार्गवे (विभाग संघटक नाशिक) प्रा.डॉ.आत्माराम महाजन (अध्यक्ष- नंदुरबार जिल्हा सेवा केंद्र), प्रा. श्रीधर देसले (शेती विद्यालय धुळे) श्री. सुरेश वाघ (अध्यक्ष- वीज तक्रार निवारण मंच नाशिक (सेवानिवृत्त), श्री.नंदकुमार कोरे (पुणे सचिव प्रवासी महासंघ महाराष्ट्र), सौ.श्रद्धा बहिरट (पंढरपूर सदस्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई) श्री.भूषण मोरे (सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन ठाणे) श्री.नंदकुमार कोरे (पुणे सचिव प्रवासी महासंघ महाराष्ट्र), अॕड. श्रीधर व्यवहारे (नाशिक राष्ट्रीय सहसचिव NIPM कलकत्ता) हे मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अध्यक्ष- ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग व जिल्हाध्यक्ष-ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग, जिल्हा संघटक श्री. एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष श्री. संदेश तुळसणकर यांनी केले आहे.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्यस्तरीय आॕनलाईन अभ्यास वर्ग उद्या पासून सुरू…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES