मालवण, ता. १४ : कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विविध क्षेत्रात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आरोग्य सेविका दिव्या पांजरी, आरोग्य सेवक सिद्धेश धुरी, आशा स्वयंसेविका संध्या कांदळगावकर, स्वाती बेलवलकर, आरोग्य मदतनीस प्रविणा हिर्लेकर, ग्रामपंचायत कर्मचारी गजानन सुर्वे, आशिष आचरेकर, अश्विनी लाड, रमण कदम, महावितरण वायरमन प्रसाद मेस्त्री, क्वारंटाईन काळात सेवा देणाऱ्या ओझर हायस्कूलचे मुख्याध्यापक पि. आर. खोत जिल्हा परिषद शाळा कांदळगाव क्रमांक १ च्या मुख्याध्यापिका ईजाबेन फर्नांडिस, शिक्षिका संध्या मेथर आणि परबवाडा शाळा नं २ मुख्याध्यापिका पल्लवी राणे, अंगणवाडी सेविका अपर्णा पाटकर, श्रीमती दिपिका बागवे आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व सदस्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल तसेच तिन्ही शाळा कर्मचारी मदत करणारे ग्रामस्थ या सर्वांचे सरपंच उमदी परब यांनी आभार मानले. अशाच प्रकारे सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपसरपंच आनंद आयकर, सदस्य रणजित परब, सदस्या अक्षता परब, माधवी कदम, श्रद्धा कुंभार, ग्रामसेवक सागर देसाई, आरोग्य सेविका दिव्या पांजरी, सिध्देश धुरी, स्वाती बेलवलकर, संध्या कांदळगावकर, गजानन सुर्वे, आशिष आचरेकर, प्रसाद मेस्त्री, रमण कदम, अंगणवाडी सेविका अपर्णा पाटकर, श्रीमती दिपिका बागवे, ओझर हायस्कूल मुख्याध्यापक श्री.खोत, मुख्याध्यापक ईजाबेन फर्नांडिस, संध्या मेथर, मुख्याध्यापिका पल्लवी राणे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन आशिष आचरेकर यांनी केले. ग्रामसेवक देसाई यांनी आभार मानले.
कांदळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना योद्धयांचा सत्कार…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES