सतीश सावंत; पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे शिवसेनेच्यावतीने मागणी…
कणकवली,ता.१४: भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनची बैठक लवकरात लवकर लावण्यात यावी व तसा सकारात्मक निर्णय घेण्यात यावा,अशी मागणी शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. दरम्यान श्री.सावंत यांच्या मागणीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी,तात्काळ बैठक लावण्यात यावी, अशा सूचना श्री.सामंत यांनी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना दिल्या आहेत.
श्री.सामंत हे दौऱ्यावर असताना सावंत यांनी त्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे. गेल्यावर्षी मार्केटिंग फेडरेशन बैठक उशीरा झाल्यामुळे भात खरेदीला वेळ लागला, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद निहाय प्रत्येक तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजे.त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे,असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.