कुडाळ लायन्स क्लबचा पुढाकार; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम…
वेंगुर्ले ता.१४: शहरातील व्यावसायिक रिक्षा चालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने रिक्षाचालकाच्या पाठीमागील भागात प्रवासी व चालक मधील भागात बसविण्यासाठी प्लँस्टिकचे पार्टीशनसाठी प्लँस्टिक कापडाचे वितरण लायन्स क्लब ऑफ कुडाळतर्फे करण्यांत आले.
लायन्स कलब ऑफ कुडाळच्यावतीने वेंगुर्ले शहरातील सेंटलुक्स हॉस्पीटल, गाडीअड्डा, दाभोली नाका, वेंगुर्ले बसस्टँण्ड येथील रिक्षा स्टँण्डवरील सर्व रिक्षाचालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने रिक्षाचालक रिक्षेत बसतात त्यांच्या पाठीमागील भागामधून रिक्षा चालक व प्रवासी यांचा बोलताना संपर्क येऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या व्यक्तीपासून रिक्षा चालकांस सुरक्षितता रहावी. यादृष्टीने रिक्षाचालकाच्या पाठीमागील भागात प्लँस्टिकचे पार्टीशनसाठी प्लँस्टिक कापडाचे वितरण लायन्स क्लबचे पदाधिकारी अँड. अजित भणगे, सुनिल सौदागर, श्रीनिवास नाईक, श्री. जगताप आदींनी वितरण केले. यावेळी रिक्षाचालक भाई मोरजे, एकनाथ राऊळ, अरूण नाईक, सतीश म्हापणकर, मिलींद निकम आदि उपस्थित होते.