अनेक युवकांचा मनसेत प्रवेश
वेंगुर्ला,ता.१४: येथील मनसेच्या महिला तालुका अध्यक्षपदी अॅड. श्रद्धा सूचित परब यांची आज निवड करण्यात आली. माजी आमदार तथा मनसे नेते परशुराम उपरकर यांनी ही निवड जाहीर केली. यावेळी तालुक्यातील अनेक युवकांनी मनसे मध्ये प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
वेंगुर्ला येथील या कार्यक्रमात मनविसे जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, उपजिल्हा अध्यक्ष परशुराम (आबा ) परब ,तालुका अध्यक्ष महादेव तांडेल, उप तालुका अध्यक्ष विशाल माडये, बाळा पावसकर, दत्ताराम गावकर, बाबल गावडे, सुंदर गावडे, दादा हुले, मनसे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सनी बागकर, तालुका सचिव राजाराम (आबा) चिपकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान प्रवेश केलेल्या काही युवकांना पक्षाच्या पदांचीही जबाबदारी यावेळी देण्यात आली. यामध्ये रेडी येथील विभागीय अध्यक्षपदी अभि आजगावकर, शाखाध्यक्षपदी रोशन पांडजी, उपशाखा अध्यक्षपदी देवेंद्र सातार्डेकर, शाखा अध्यक्ष आरवली टांक पदावर देवेंद्र फोडनाईक यांचा समावेश आहे. यावेळी ऋतिक. दी.वस्त, साहील म्हापणकर, रोहीत रेडकर, रविकिरण पांडजी, गोविंद मातोंडकर-मातोंड, सूचित परब, शैलेश बागकर आरवली यांनीही प्रवेश केला.
दरम्यान सध्या सक्रिय कार्य करणारे राजाराम (आबा) चिपकर याना तालुका सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली तर महादेव तांडेल यांची विद्यार्थी सेना तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.