अन्य एका संशयिताला न्यायालयीन कोठडी; जामीन अर्ज फेटाळला…
सावंतवाडी,ता.१४: माजगाव येथे घरात घुसून लॅपटाॅप चोरी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आंबोली खुनातील संशयित योगेश कांबळे याला आज येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, तर त्यातील मुख्य संशयित अरबाज शहा याला न्यायालयीन कोठडीत देण्यात आली. त्याच्या जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला होता.मात्र न्यायालयात मागणी फेटाळून लावली. याकामी सरकारी पक्षातर्फे स्वप्निल कोलगावकर यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजगाव येथील रोहन माजगावकर यांच्या घरात घुसून अरबाज शहा आणि योगेश कांबळे या दोघांनी चोरी केली होती. या प्रकरणी सर्वांची चौकशी सुरू होते. दरम्यान यातील योगेश कांबळे याला काल अटक करण्यात आली.आज त्याला येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.