वेंगुर्ला,ता.१४: तालुक्यातील दाभोली गणपती मंदिर ते दाजी आश्रम मार्गाच्या दुरुस्तीकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध व्यक्त करत दाभोली ग्रामस्थांनी रस्त्यावर आलेली माती व बाजूने वाढलेली झुडपे श्रमदानाने छाटून रस्ता सुस्थितीत केला.
दाभोली- खानोली दाजी आश्रम मार्ग लोखंडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोऱ्याची वाडी गणपती मंदिरापासून दाजी आश्रम पर्यंत पावसाळ्यात वाहून आलेली माती व रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झुडपे तोडण्यासाठी बांधकाम विभागास वारंवार सांगण्यात आले. मात्र बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दाभोली सरपंच उदय गोवेकर, पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर, महेश खानोलकर यांनी या श्रमदानासाठी सहकार्य केले. श्रीकांत चेंदवळकर, अण्णा जोशी, अमित बोवलेकर, जगन्नाथ पेडणेकर, संतोष पेडणेकर, राजेश कांबळी, दाजी पेडणेकर आदी ग्रामस्थ यांनी श्रमदान करत रस्ता सुस्थितीत केला.