सावंतवाडी ता.१४: शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील तपासणीला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे.तर २४ ऑक्टोबर पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. याबाबतची माहिती पालिकेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,कोरोना नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अंतर्गत कोविड मुक्त महाराष्ट्र ही मोहीम पालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात आली. दरम्यान या मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु करण्यात आला आहे.यात प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळीची तपासणी करून आरोग्य विषयक संदेश देण्यात येणार आहेत.या संरक्षण पथकामध्ये दोन कर्मचारी असणार आहेत.कोमॉर्बीड आढळलेल्या व्यक्ती तसेच पहिल्या आढळलेली व्यक्तींची तपासणी करून नोंद घेतली जाणार आहे.सावंतवाडी शहरातील नागरिकांनी संबंधित मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब आरोग्य सभापती परिमल नाईक,मुख्याधिकारी संतोष जिरगे व पालिकेचे आरोग्य अधिकारी उमेश मसुरकर यांनी केले आहे.
सावंतवाडीत “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES