Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामळगाव घाटीत झाड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत..

मळगाव घाटीत झाड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत..

सावंतवाडी,ता.१४: आंबोली घाटात सकाळी झाड कोसळल्याची घटना ताजी असतानाच सावंतवाडी-शिरोडा मार्गावर मळगाव घाटीत सायंकाळी झाड कोसळले.त्यामुळे काही तास वाहतूक खोळंबली होती. मात्र त्या ठिकाणी वन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना धाव घेत कर्मचारी आणि वाहनधारकांच्या मदतीने ते झाड बाजूला केले. त्यामुळे वाहतूक सुरू झाली.

ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे झाडे कोसळण्याचा प्रमाण वाढत आहे.सकाळी आंबोली घाटात झाड कोसळले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments