चराठा,कारिवडे,माडखोल परिसरात जाणवले धक्के…
सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.१४: शहरात आज रात्री भूकंपाचा धक्का जाणवला. चराठा,कारीवडे,माडखोल भागात हा धक्का मोठ्या प्रमाणात जाणवला,मात्र अधिकृत माहिती कळू शकली नाही.ही घटना आज ८:५३ मिनिटांनी घडली.
दरम्यान याबाबत माडखोल सोसायटीचे अध्यक्ष दत्ताराम कोळेकर म्हणाले,माडखोल परिसरात धक्का बसला,तर बावळाट येथील ग्रामस्थ सूर्यकांत परब यांनी आपल्या गावात मोठा आवाज झाला आणि घरातील खुर्च्या,पलंग आदी वस्तू जोरात हलल्या असे सांगितले. पत्रकार अनिल कुडाळकर यांनीही चराठा परिसरात सौम्य धक्के जाणवले, असे सांगितले. याबाबत तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना अधिक माहितीसाठी संपर्क केला, परंतू संपर्क होवू शकला नाही.