घाबरू जावू नका, चौकशी करू तहसीलदारांचे म्हणणे, उद्या होणार नेमके चित्र स्पष्ट…
सावंतवाडी/अमोल टेंबकर, ता. १४ : तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यासह शहरात आज सायंकाळी झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्याबाबत महसूल प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात मतमतांतरे आढळून आली.
धक्क्याच्या आधी काही सेकंद जोरदार आवाज झाला असे काही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणीतरी क्वारी किंवा विहिरीसाठी ब्लास्टींग केले असावे असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे म्हणणे आहे. याबाबत आपण उद्या चौकशी करू कोणी घाबरून जावे नये असे त्यांनी म्हटले. परंतु काही ग्रामस्थ व शहरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात ब्लास्टिंग केले जात नाही आणि ब्लास्टिंग केले तरी इतक्या गावात तो धक्का पोहोचू शकत नाही. त्यामुळे तो भूकंपाचा धक्का होता असा दावा जात आहे. याबाबत अनेकांनी आपली भूमिका मांडली आहे तर तहसीलदार श्री. म्हात्रे यांनी ब्रेकिंग मालवणीशी संपर्क साधून माहिती दिली. ते म्हणाले, क्वारी अथवा विहिरीसाठी अज्ञात व्यक्तीकडून हा स्फोट घडवला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार धक्क्यापूर्वी मोठा आवाज झाला. त्यामुळे हा स्फोट असावा असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान अनेक ग्रामस्थ व शहरातील नागरिकांनी आपल्याला धक्का जाणवला असे सांगितले. यात आंबोली, बावळाट, माडखोल, आंबेगाव, कारीवडे, वेर्ले, शिरशिंगे या गावांसह शहरातील काही भागाचा समावेश आहे. शहरातील काही नागरिकांची संपर्क साधल्यानंतर आपल्याला धक्का जाणवला असे त्यांनी सांगितले. त्यामुळे ब्लास्टींगचा धक्का गावात इतक्या गावात पोचू शकतो का हे मात्र पण प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे याबाबत तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार चौकशी अंती नेमका भुकंप की ब्लास्टींग हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये. आम्ही नेमका प्रकार काय याची चौकशी करत आहोत असे म्हात्रे म्हणाले.