कोयनेत नोंद ; २.९ रिश्टेलचा सौम्य धक्का असल्याचे धरण प्रशासनाचे म्हणणे…
सावंतवाडी/अमोल टेंंबकर ता.१५: सह्याद्री पट्ट्यासह सावंतवाडी शहरात काल रात्री झालेल्या भुकंपाबाबत मत मतातंरे असताना,”तो” भुकपंच असल्याचा दावा करण्यात आला आहे.याबाबतची नोंद कोयना धरण क्षेत्रातील मापक यंत्रावर झाली आहे.त्यात काल रात्री ८ वाजून ५१ मिनीटांनी२.९ रिश्टेलची नोंद झाली आहे.दरम्यान हा सौम्य धक्का होता,असे त्याचे म्हणणे आहे.याबाबतची माहीती संबधित प्रकल्पाचे अधिकारी श्री.चौधरी यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिली आहे.काल रात्री उशिरा भुकंप झाला होता.याचा धक्का बावळाट आंबोली,दाणोली,माडखोल,कारीवडे ,कुणकेरी आदी गावासह सावंतवाडी शहराला बसला होता.
दरम्यान याबाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनीही दुजोरा दिला आहे.आपण कोयनेत संपर्क साधल्यानंतर ती माहिती मिळाली,परंतु तरीही परिसरात नेमका स्फोट करण्यात आला का ?याचा तपास करत आहोत.