Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहिर...

ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहिर…

बांदा,ता.१५: माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आयोजित ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत डेगवेच्या गायत्री देसाई यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. डेगवेच्या प्रियांका देसाई यांनी द्वितीय तर सावंतवाडीच्या दीपराज गावडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
येथील खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूलतर्फे भारतरत्न डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रशालेतर्फे ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात करताना अनिकेत सावंत सरांनी विद्यार्थ्याबराेबर पालक व समाज्यातील सुजाण वाचक वर्गासाठी बहुमूल्य मार्गदर्शन हे कार्यक्रमाचे केंद्रबि्दू ठरले. उत्तम देसाई स्मरणार्थ पी. यु. देसाई पुरस्कृत या स्पर्धेत एकूण ४६४ स्पर्धकांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांची निवड लकी ड्रॉद्वारे करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम- गायत्री देसाई (डेगवे), द्वितीय प्रियांका देसाई (डेगवे), तृतीय दीपराज गावडे (सावंतवाडी), चतुर्थ आयलिन फर्नांडिस (आचरा) व भाविका पालव (कुडाळ) यांनी पाचवा क्रमांक मिळविला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल संतोष परब व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री काळे यांनी मेहनत घेतली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर, उपप्राचार्य पी. यु. देसाई, पर्यवेक्षक नंदूकिशाेर नाईक, ग्रंथपाल संतोष परब, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments