पुंडलिक दळवींची टिका ; हा तर सत्ताधारी आणी प्रशासनाचा अंदाधुंद कारभार…
सावंतवाडी,ता.१५: नगरपलिकेतील सत्ताधारी गटनेते नगरसेवक राजू बेग यांच्या माठेवाडा प्रभागात काल संध्याकाळपासून नळाला पाणी आले नाही. त्यामुळे नळाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांचे अतोनात हाल झाले. दोन दिवस पाणी नसल्याने लोकांचे प्रातर्विधीपासून आंघोळीचे प्रचंड हाल होत होते. यामुळे माठेवाडा प्रभागाचे नगरसेवक राजू बेग यांनी नगरपालिकेच्या आवारात घागर वाजवून प्रशासशाचा निषेध करत पाण्यावाचून होत असलेल्या भावनांना आंदोलनातून वाट मोकळी करून दिली. तर सत्ताधाऱ्यांच्याच गटनेत्यांला नगरपलिकेत पाण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच काय?, असा सवाल राष्ट्रवादीचे व्यापार उद्योग सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी उपस्थित केला. तर सत्ताधारी आणि प्रशासनाच्या अंधाधुंद कारभाराचा त्यांनी निषेध केला.