कणकवली शहरात फटाक्यांची आतषबाजी ; पेढे वाटून जल्लोष…
कणकवली, ता.१५: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजला शासनाने परवानगी दिली. त्यानंतर आज शिवसैनिकांनी कणकवली शहरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तसेच पेढे वाटून जल्लोषही करण्यात आला. यावेळी शिवसेना झिंदाबाद, बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, राऊत साहेब आगे बढो..हम तुम्हारे साथ हैं..अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.
कणकवली शहरात पटवर्धन चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,नगरसेवक सुशांत नाईक,युवा सेना समन्वयक राजू राठोड,शहरप्रमुख शेखर राणे,दामू सावंत,रिमेश चव्हाण,विलास गुडेकर,सचिन पोळ,श्री.वळंजू,विलास राठोड,सतू गुडेकर,नितीन अंकुश राव,अविराज खांडेकर,पराग पवार,सचिन राठोड आदी शिवसैनिक उपस्थित होते.