शाम सावंत; शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली मागणी…
सावंतवाडी ता.१५: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे,अशी मागणी नागरिक कृती समितीचे पदाधिकारी शाम सावंत यांनी आज येथे केली.शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.दरम्यान ठाकरे सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर कृती समितीकडून गेल्या पाच वर्षात करण्यात आलेल्या पुरवायला यश आले आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,बाबू कुडतरकर,रश्मी माळवदे ,विशाल सावंत आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी नागरी कृती समितीकडून गेली पाच वर्षे पाठपुरावा सुरू होता,याच माध्यमातून सरकारला या मागणी संदर्भात २५ हजार पत्र पाठविण्यात आली होती.तसेच १३० ठराव ग्रामसभेत घेण्यात आले होते.तर सरकारला जाग आणण्यासाठी १५ ऑगस्ट २०१९ ला उपोषणही छेडण्यात आले होते.या सर्व प्रयत्नांना आता यश आले आहे.ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय हा जिल्हावासीयांसाठी स्वागतार्ह आहे.जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, ही राजकीय नेत्यांसह तळागाळातील जनतेची सुद्धा मागणी होती.त्यामुळे शासनाच्या या निर्णयानंतर आता सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले आहे,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.