राजेंद्र म्हापसेकर; जनावरांपासून आजार,पशुपालकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन…
ओरोस,ता.१५: जनावरांपासून माणसांना होणाऱ्या क्रायमिन कांगो ह्युमोरेजिक फिवर या नव्या आजाराने गुजरात राज्यातून भारतात प्रवेश केला आहे. बाधित जनावरांपासून याची लागण माणसांना मोठ्या प्रमाणात होते. गुजरात हे महाराष्ट्राला लागून असल्याने सिंधुदुर्गातील पशुपालकांनी आणि जनावरांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची मासिक सर्व साधारण सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन समिती सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. यामध्ये स्वरूपा विखाळे, मानसी धुरी, मनस्वी घारे, रोहिणी गावडे, आदी सदस्यांसह जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप शिंपी व अन्य विभागाचे अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.