वाभवे-वैभववाडी नगरपंचायतच्या माध्यमातून साकारतोय प्रकल्प…
वैभववाडी,ता.१५: वाभवे-वैभववाडी नगरपंचायतच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या प्लास्टिक निर्मूलन आणि कंपोस्टिंग प्रकल्पाचा शुभारंभ भाजपा आ. नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडला. वाभवे पाटीलवाडी नजीक हा प्रकल्प होणार आहे. प्रकल्पासाठी जमीन देणारे अमोल शिवाजी इंदप, अमित इंदप, व सिद्धेश इंदप यांचा आ. नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी रत्नाकर कदम, शिक्षण व आरोग्य सभापती सुचित्रा कदम यांनी या कामासाठी विशेष प्रयत्न केले. याबद्दल त्यांचे उपस्थितांनी आभार मानले.
या कामाच्या शुभारंभप्रसंगी नगराध्यक्ष समिता कुडाळकर, भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, माजी सभापती दिलीप रावराणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, मुख्याधिकारी सुरज कांबळे, नगरसेवक रवींद्र तांबे, संपदा राणे, शोभा लसणे, प्राची तावडे, संजय सावंत, स्वप्नील ईस्वलकर, संताजी रावराणे, रोहित रावराणे, वाभवे सोसायटी माजी चेअरमन दत्तात्रय इंदप, वामन करकोटे, आशिष रावराणे, शिवाजी राणे, दीपक गजोबार, संतोष कुडाळकर, सुनील भोगले, संतोष महाडिक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.