वेंगुर्ला,ता.१५: तालुक्यात दोन दिवसात आलेल्या रिपोर्ट नुसार एकूण ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.
तालुक्यात काल शिरोडा येथे ३ सहवासीत आणि बागायत उभादांडा येथे १ असे चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. तर आज तीन पॉझिटिव्ह सापडले. त्यात शिरोडा येथे २ नवीन रुग्ण आणि वेंगुर्ला शहर येथे १ रुग्ण आढळला आहे.
तालुक्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४१० वर पोहचली आहे. त्यात वेंगुर्ला शहरातील १४० आणि ग्रामीण भागातील २७० जणांचा समावेश आहे. यापैकी ३५३ रुग्ण बरे झाले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून उपचाराखाली ४८ रुग्ण आहेत.
वेंगुर्ला तालुक्यात ७ जण कोरोना पॉझिटिव्ह…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES