या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प; फोंडा मार्गे वळविली…
वैभववाडी/पंकज मोरे
तालुक्यात तब्बल दोन दिवस धुवाधार कोसळणा-या परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने करुळ घाटात विश्रांती हॉटेल नजिक रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे.
तालुक्यासह जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाने जोरदार मूसंडी मारल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा फटका भात शेतीवर बसला असून बहुतांशी भात शेती पाण्याखाली गेली आहे. घाटरस्ते तर ‘डेंजरझोन’ बनले आहेत. गुरुवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने करुळ घाटात हॉटेल विश्रांती नजिक रस्ता खचल्याने पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान वैभववाडी पोलिस व बांधकाम विभागाने खबरदारी म्हणून या ठिकाणी बॕरल व बॕरिकेट्स लावले आहेत.