सिंधुदुर्गात शासकीय महाविद्यालयास मान्यता दिल्याबद्दल घेतली भेट ; महाविद्यालय उभारणीस निधी कमी पडू न देण्याचे आश्वासन…
मालवण, ता. १६ : सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्याबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला. त्यानंतर खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आभार मानले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासननिर्णयाची प्रत खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांच्याकडे सुपूर्त केली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीस लागणारा निधी कमी पडू देणार नाही. त्याचबरोबर लवकरच या महाविद्यालयाच्या उभारणीला सुरुवात करूयात असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी आश्वासित केले.
यावेळी खासदार अनिल देसाई, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास उपस्थित होते.