Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभात पीक नुकसानीचा तात्काळ पंचनामा करा...

भात पीक नुकसानीचा तात्काळ पंचनामा करा…

वैभववाडी शिवसेनेच्यावतीने तहसिलदारांना निवेदन…

वैभववाडी,ता.१६: जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भात पिकांची नासाडी होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी शेतकऱ्यांना या नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी भात पीक नुकसानीचे पंचनामे करा अशा आशयाचे निवेदन वैभववाडी शिवसेनेच्यावतीने तहसिलदारांना दिले आहे.
वैभववाडी तालुका सह्याद्री पर्वत रागांच्या पायथ्याशी वसलेला असल्याने तालुक्यातील ९० टक्के पेक्षा जास्त लोक शेती करून आपला उदरर्निवाह करीत आहेत. विशेषतः वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पीक लागवड केले जाते. येथील शेती ही पूर्णतः पावसावर अवलंबून असते.
दरवर्षी पेक्षा यावर्षी उच्चांकी पाऊस झाला आहे. सरासरी ५ हजार मि. ली. पाऊस पडल्याने भात पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन भात शेती पाण्यात वाहून गेली आहे. अतिवृष्टीमुळे कापणी योग्य झालेले भात पीक जमिनीवर कोसळून त्याला पुन्हा अंकुर आले आहेत. त्यामुळे भात पीकाची अधिक नासाडी झाली आहे.
शिवाय गवत कुजल्याने गुरांच्या चा-याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी भात पिकाचे पंचनामे करावे. तसेच नुकसान भरपाई मिळण्यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांच्या मार्फत शासन स्तरावर प्रयत्न करु. अशा आशयाचे निवेदन वैभववाडी शिवसेनेच्यावतीने तहसिलदारांना दिले आहे.
यावेळी निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके. शहर प्रमुख प्रदिप रावराणे, राजू पवार, भुईबावडा शहर प्रमुख रविंद्र मोरे, दिपक कदम, गणेश पवार, शंकर कोकरे, दिपक पवार, राकेश पवार आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments