शारदा कांबळे; वैभववाडीत धम्म प्रवर्तक दिन साजरा…
वैभववाडी/पंकज मोरे,ता.१६:संपूर्ण जगाला आज बुद्ध तत्वज्ञानाची गरज आहे. त्यामुळे केवळ धार्मिक विधी पुरता बुद्ध धम्म मर्यादित ठेवू नका. तर त्याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे. त्याचे आचरण स्वतःच्या घरापासून सुरू करा. यातूनच बाबासाहेबांना अपेक्षित बौद्ध समाज निर्माण होईल. असे प्रतिपादन समाजकल्याण सभापती शारदा कांबळे यांनी व्यक्त केले.
वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने वैभववाडी येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आयोजित धम्म चक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात समाजकल्याण सभापती कांबळे बोलत होत्या.यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, सचिव रविंद्र पवार, उपाध्यक्ष संतोष कदम, शरद कांबळे,सुरेंद्र यादव, धोंडीराम तांबे,धर्मक्षित जाधव, प्रमोद जाधव, प्रफुल्ल जाधव, श्रीपत कुसूरकर, रुपेश कांबळे , मंगेश कांबळे, आदी उपस्थित होते.
संपूर्ण जगाला आज बुध्द तत्त्वज्ञानाची गरज आहे.त्यामुळे केवळ धार्मिक विधी पुरता बुध्द धम्म मर्यादीत ठेवू नका.तर त्याप्रमाणे आचरण करणे आवश्यक आहे.त्याचे आचरण स्वतःच्या घरापासून सुरु करा.यातूनच बाबासाहेबांना अपेक्षित बौध्द समाज निर्माण होईल.असे सांगितले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संतोष कदम, श्रीपत कुसूरकर, सुभाष कांबळे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात तालुका संघटनेच्या बौध्द उपासकांनी ञिसरणं पंचशिल व विधी संचलन करुन केले.कार्यक्रमाचे सूञसंचलन प्रफुल्ल जाधव तर आभार शरद कांबळे यांनी मानले.
फोटो-दिपप्रज्वलन करतांना समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सोबत सुभाष कांबळे, संतोष कदम, रविंद्र पवार व इतर