Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआंबोली-हिरण्यकेशी नदीत आढळला नव्या प्रजातीचा मासा....

आंबोली-हिरण्यकेशी नदीत आढळला नव्या प्रजातीचा मासा….

तेजस ठाकरेंचे संशोधन; “हिरण्यकेशी” मासा,असे नामकरण…

मुंबई ता.१६: आंबोलीतील हिरण्यकेशी नदीत सोनेरी रंगाचे केस असणारा नवा मासा मिळाला आहे.ही माशाची २० वी प्रजाती असून त्याचा शोध मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी लावला आहे.दरम्यान त्या माशाला “हिरण्यकेशी” मासा असे नामकरण करण्यात आले आहे.
श्री.ठाकरे यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगात माशाची चौथी नवीन प्रजाती शोधून काढली आहे.अंबोली घाटातील हिरण्यकश नदीत सोनेरी रंगाचे केस असणाऱ्या माश्याची नवी प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधली आहे.या माश्याची ही २० वी प्रजाती आहे.तर तेजस ठाकरे यांनी शोधलेली ही चौथी प्रजाती आहे.या आधी त्यांनी सह्याद्रीच्याच पर्वत रांगात पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधून काढल्या होत्या.
या माशाचं नाव ‘हिरण्यकेशी’ ठेवण्यात आले आहे.त्यांना आंतरारष्ट्रीय स्तरावरील जीवशास्त्र मासिकांनीही प्रसिद्धी देऊन मान्यता दिली होती.आता हिरण्यकेशी नदीत शोधलेल्या या नव्या प्रजातीच्या माशाचं नाव ‘हिरण्यकेशी’ असं ठेवण्यात आले आहे.याचा संस्कृत अर्थ सोनेरे रंगाचे केस असणारा मासा,असा आहे.माश्याच्या या नवीन प्रजातींना शोधण्यासाठी ठाकरे यांना अंडर वॉटर फोटोग्राफर शंकर बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा जे रिसर्च पेपरचे प्रमुख आहेत,यांचे सहकार्य मिळाले.याआधी तेजस ठाकरे यांनी आणखी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे.सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल ११ दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला होता.त्याआधी कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत असताना तेजस यांनी खेकड्याच्या पाच प्रजाती शोधल्या होत्या.खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा हा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला आहे. न्यूझीलंडच्या ‘झुटाक्सा’ हे नियतकालिक आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मिळ खेकड्यांविषयी दुसरं संशोधन प्रसिद्ध झालं होतं.विशेष म्हणजे पश्चिम घाटातील ‘सह्याद्री’ या रांगड्या मराठी नावावरुन एका खेकड्याचं ‘सह्याद्रियाना’ असं नामकरण करण्यात आलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments