Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयाला मागच्या पालकमंत्र्यांकडून मिळालेल्या मंजुरीचे झालं काय...?

सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयाला मागच्या पालकमंत्र्यांकडून मिळालेल्या मंजुरीचे झालं काय…?

कुणाल किनळेकर; सत्ताधारी सरकारला मनसेकडून सवाल, जिल्हावासियांची दिशाभूल नको…

कुडाळ ता.१७: सिंधुदुर्गात पुन्हा एकदा नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ठाकरे सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.मग मागच्या पालकमंत्र्यांनी मिळवलेल्या मंजुरीचे काय झालं ?, असा सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला आहे.दरम्यान प्रस्तावित महाविद्यालयासाठी कोणती जागा निश्चित करण्यात आली आहे?,तसेच गेल्या सहा वर्षात बांधून पूर्ण झालेले कुडाळ येथील महिला रुग्णालय कधी सुरू होईल ?,असे अनेक प्रश्न उपस्थित करत,नुसतेच मंजुरी मिळाल्याचे फोटो सेशन करून सत्ताधाऱ्यांनी जिल्हावासियांची दिशाभूल करू नये,असाही टोला त्यांनी लगावला आहे.याबाबत श्री.किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,तसेच गेल्या सहा वर्ष बांधून पूर्ण झालेले कुडाळ येथील महिला रुग्णालय कधी सुरू होणार की, नुसतेच निधी मंजुरीचे फोटो आणि त्यानंतर परत आरोग्य मंत्र्यांकडे निधीच्या मागणीचे फोटो गेल्या सहा वर्षांपासून सामान्य जनता हेच बघते आहे.निवडणुकीपूर्वी मंजूर पंणदुर-घोडगे सोनवडे-कोल्हापुर घाट रस्त्याचे मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले.त्याच काय की नुसतेच फोटो सेशनची धुळफेक.लोकसभा निवडणुकीपूर्वी ठिकाणी मोठ्या थाटामाटात मोबाईल टॉवरची सन्माननीय खासदार साहेबांनी शोबाजी भुमीपुजन केली.त्याच काय झालं सध्या परिस्थिती ग्रामीण भागातील जनतेला ऑनलाईन शिक्षण किंवा वर्क फ्रॉम होम साठी शहरी भागात अतिरिक्त पैसे खर्च करून रूम भाड्याने घेऊन राहावे लागत आहे. त्यामुळे या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी नुसतेच फोटोसेशन करून आपली पाठ थोपटून घेऊन सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यापेक्षा काही तरी प्रत्यक्षात आणावे ही सिंधुदुर्गच्या सामान्य जनतेकडून मनसे विनंती.आणि महत्वाचं म्हणजे दुरऱ्यांदा मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कधी काम चालू होईल व कधी पुर्ण होईल हे माहीत नसलेल्या(तसेच तोपर्यंत सत्तांतर विषय आहेच)मेडिकल कॉलेजला आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करण्यापेक्षा, सद्यस्थितीमध्येपूर्ण झाले आणि चालू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे,अशी विनंती वजा मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने करत आहोत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments