मालवण, ता. १६ : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळाल्याबद्दल मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने आज फटाके वाजवून तसेच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, महिला तालुका समन्वयक पुनम चव्हाण, महिला तालुका प्रभारी दिपा शिंदे, उमेश मांजरेकर, मनोज मोंडकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, किसन मांजरेकर, बाळु नाटेकर, तपस्वी मयेकर, महेंद्र म्हाडगुत, श्री. पेडणेकर, अनंत पाटकर, किशोर गावकर, अक्षय भोसले यांच्यासह अन्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.