सावंतवाडी ता.१६: माजगाव-खालचीआळी घरफोडी प्रकरणातील दुसरा संशयित योगेश कांबळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.संबंधिताच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
ही घरफोडी दोघांनी मिळून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.तर अन्य कोणीही साथीदार या या प्रकरणात सहभागी नसल्याचे त्याने सांगितले .तसेच चोरीस गेलेला उर्वरित मुद्देमाल हा योगेश कांबळे याने एका मित्राकडे ठेवण्यासाठी दिला होता.तोही पोलिसांनी हस्तगत केला आहे.कांबळे याचा साथीदार असलेला अरबाजशहा यांची यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती,दरम्यान कांबळे याचा आंबोली खून प्रकरणातही सहभाग असल्याने तोही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.
माजगाव-खालचीआळी घरफोडी प्रकरणातील दुसऱ्या संशयिताला न्यायालयीन कोठडी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES