Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअन्यथा...स्थानिक आमदारांच्या घरासमोर मनसेचे "जेवण वाढा" आंदोलन...

अन्यथा…स्थानिक आमदारांच्या घरासमोर मनसेचे “जेवण वाढा” आंदोलन…

बनी नाडकर्णींचा इशारा; एसटी कर्मचाऱ्यांचा पगार तात्काळ देण्याची मागणी…

कुडाळ,ता.१६: एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्याचा पगार तात्काळ द्या, अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसमवेत स्थानिक आमदारांच्या घरासमोर “जेवण वाढा” आंदोलन करू, असा इशारा मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिला आहे.

कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपला जीव मुठीत घेऊन सतेज सेवा बजावणाऱ्या आपल्या एस टी कर्मचाऱ्यांना सतत 3 महिने पगारासाठी भीक मागावी लागत आहे. वारंवार या संदर्भात पत्रव्यवहार करूनही एसटी कर्मचा-यांसाठी कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा मंत्री त्याची दखल घेत नसल्यामुळे आता कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामूळे मनसे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना सर्व एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सोबत रस्त्यावर उतरून स्थानिक आमदारांच्या घरा समोर जेवण वाढा आंदोलन करणार असा इशारा देत एसटी कर्मचा-यांचा लवकरात लवकर पगार द्या अशी मागणी मनसे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments