मालवण, ता. १६ : मालवण तालुक्यातील खैदा-कातवड येथील एक विवाहिता आपल्या दोन मुलींसह ६ ऑक्टोबर पासून बेपत्ता असल्याची खबर पती सागर कोकरे यांनी आज येथील पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता नोंद केली आहे.
खैदा- कातवड येथील सौ. संजना सागर कोकरे (वय-२८) या मुलगी वैष्णवी कोकरे (वय-९), रिया कोकरे (वय-६) यांच्यासह ६ ऑक्टोबरला घरातून निघून गेली. त्यानंतर तिने एका मोबाईलवरून आपण मुलींसह मुंबई येथे जात असल्याचे सांगितले. मात्र ती मुंबई येथे गेली नसल्याची माहिती नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत मिळाली. त्यांचा अन्यत्र शोध घेण्यात आला मात्र त्या सापडल्या नसल्याची माहिती पती सागर कोकरे यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता नोंद केली आहे. पोलिस हवालदार हेमंत पेडणेकर अधिक तपास करत आहेत.
खैदा- कातवड येथून विवाहिता दोन मुलींसह बेपत्ता…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES