सिंधुदुर्गनगरी,ता.१६:
गणेशोत्सवानंतर जिल्हावासियांना वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे! दरवर्षी गरबा दांडिया मंडळ या उत्सवाची जय्यत तयारी करतात मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. शासकीय नियम आणि आवश्यक ती खबरदारी घेत या उत्सवासाठी ही मंडळ सज्ज झाली आहेत. शनिवार १७ ऑक्टोंबर या घटस्थापनेदिवशी जिल्ह्यात ११७ सार्वजनिक तर ३१ खासगी अशा मिळून १४८ ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याशिवाय अनेक देवींच्या मंदिरात, घरात आदी १६१ सार्वजनिक व ३१ खासगी ठिकाणी घटस्थापना केली जाणार आहे. या ठिकाणी देवींचे थाटात पूजन करून भजनादी कार्यक्रम होणार आहेत.
सिंधुदुर्गात देवींच्या मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्याची गावागावांत परंपरा आहे. पण गेल्या काही वर्षांत सार्वजनिक दुर्गामातेची मूर्ती प्रतिष्ठापना करून उत्सव साजरा करण्याची पद्धत सुरू झाली आहे. दुर्गामातेचा नवरात्रोत्सव सार्वजनिक स्वरूपाचा सुरू झाल्यापासून गुजरातचा गरबा नृत्यालाही या भागात पसंती मिळाली. दुर्गामातेसमोर गरबा नृत्य करणाऱ्या मंडळाच्या टीमची स्पर्धाही घेतली जाते. जिल्हाभरात गरबा नृत्याच्या विविध टीम ठिकठिकाणी पोहोचतात. गौरी-गणपती सणानंतर नवरात्रोत्सव सुरू होतो, पण या सणापूर्वीच मंडळाचे कार्यकर्ते व गरबा नृत्य करणाऱ्या टीमचा सराव सुरू होतो. नवरात्रोत्सव जिल्ह्य़ातील गावागावांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र यावर्षी जगभरात आणि देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे यावर्षी नवरात्रोत्सव सध्या पध्दतीने साजरा केला जाणार आहे. शासनाने हा उत्सव सध्या पध्दतीने साजरा करण्याच्या सूचना देतानाच देवीची मूर्ती किती फूट असावी याबाबत मार्गदर्शन केले आहे. यात सार्वजनिक ठिकाणी ४ फुटाची तर खासगी ठिकाणी २ फुटाची देवीची मूर्ती असावी अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
यावर्षी १७ ऑक्टोंबर या घटस्थापनेदिवशी सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११७ सार्वजनिक तर ३१ खासगी असा एकूण १४८ ठिकाणी दुर्गामातेची मूर्ती प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा उत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात १४८ ठिकाणी दुर्गामाता विराजमान होणार
जिल्ह्यात १४८ ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहेे. यात ११७ सार्वजनिक दुर्गा मातेचा समावेश आहे. यात दोडामार्ग – सार्वजनिक ८ , बांदा- सार्वजनिक ९, सावंतवाडी- सार्वजनिक १५, कुडाळ- सार्वजनिक १४, वेंगुर्ला – सार्वजनिक १०, निवती- ५ सार्वजनिक, सिंधुदुर्गनगरी- ४ सार्वजनिक, मालवण- १४ सार्वजनिक, आचरा- ४ सार्वजनिक, देवगड- ५ सार्वजनिक, विजयदुर्ग- ६ सार्वजनिक, कणकवली- १४ सार्वजनिक तर वैभववाडी ९ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तसेच ३१ खासगी ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
सिंधुदुर्गात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्री उत्सव होणार साध्या पद्धतीने साजरा…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES