बांदा ता.१६: आरोस-गावठणवाडी येथील गुरुनाथ मधुकर शिरोडकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे.ही घटना काल पहाटेच्या सुमारास घडली.दरम्यान घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.परतीच्या पावसाने गेले चार-पाच दिवस हैदोस मांडला आहे.यात भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाही चिंतेत आहे.बुधवारी रात्रो पतीच्या पावसाचा जोर वाढला.दरम्यान आरोस पंचक्रोशीसह परिसरातही सोसाट्याचा वारा-पाऊस झाल्याने घराशेजारी असलेले फणसाचे मोठे झाड घरावर कोसळले.यामध्ये वासे, रिप, नळे, घरातील साहित्य तसेच मजुरी असे मिळून सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. तर झाड घरावर कोसळल्याचे गावातील ग्रामस्थांना कळताच घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्यास मतदकार्य केले,असे श्री.शिरोडकर यांनी सांगितले.
आरोस-गावठणवाडी येथे घरावर फणसाचे झाड पडून नुकसान…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES