सावंतवाडीत उच्च शिक्षणाची संधी देणा-या “भोसले नाॅलेज सिटी”च्या आधुनिक “सरस्वती”…

2

अस्मिता सावंत-भोसले; कठोर परिश्रम आणि जिद्दीचा जिल्ह्यातील मुलांना शैक्षणिक फायदा…

सावंतवाडी/शुभम धुरी ता.२३: एखाद्या यशस्वी पुरूषाच्या मागे स्त्रिचा हात असतो असे म्हटले जाते,मात्र हे वाक्य तंतोतंत खरे करुन माहीती तंत्रज्ञानातील जनजागृती सोबत जिल्ह्यातील मोठ्या आणि दर्जेदार शिक्षण देणार्‍या “भोसले नॉलेज सिटी” सारख्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पाॅलिटेक्निक व फार्मसी सारख्या शिक्षणक्रमांच्या ज्ञानदानाचे पुण्यकर्म करण्याचा बहुमान सावंतवाडीतील सौ.अस्मिता अच्यूत सावंत-भोसले यांना मिळाला आहे.या सर्व प्रवासात त्यांनी गाठलेले यशाचे शिखर सर्वसामान्यांना प्रेरणा देणारा आहे.सावंतवाडी चराठे येथिल आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देणार्‍या भोसले नॉलेज सिटी या महाविद्यालयाचा चेअरमन एखादी महीला असेल,असे पाहणार्‍या कोणालाही खरे वाटणार नाही।मात्र हे सर्व सत्य आहे.आणि त्याचा सर्वस्वी मान हा सौ.सावंत-भोसले यांना देणे गरजेचे आहे.नवरात्र उत्सवानिमित्त ब्रेकींग मालवणीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या “जागर तिच्या कर्तृत्वाचा” या विशेष सदराखाली घेण्यात आलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले पैलू मांडले आहेत.
सौ.सावंत-भोसले याचा जन्म मडुरा सारख्या ग्रामीण भागात झाला.जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण घेवून त्यांनी आपला प्रवास यशस्वी केला.अनेकांना ज्ञानदान देणाचे पुण्यकर्म करणार्‍या सौ.सावंत-भोसले यांचा जिवनपट काहीसा वेगळा आहे.ऐन शिकण्याच्या काळात वडीलांचे अपघाती निधन होऊनही त्या डगमगल्या नाहीत.दरम्यानच्या काळात त्यांचे लग्न श्री.अच्यूत सावंत-भोसले यांच्याशी झाले आणि त्यांच्या जीवनाचा पुढील प्रवास सुरू झाला .सौ.सावंत-भोसले यांना लहानपणा पासून जिद्दीने काम करण्याची आणि ते तडीस लावण्याची आवड होती.त्या जोरावर त्यांनी आपल्या पतीला साथ देण्याचा निर्णय घेतला.यावेळी श्री.सावंत-भोसले यांनी स्थापन केलेल्या “आस्था कॉम्पुटर” अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना संगणक शिक्षणाचे धडे दिले.मात्र त्यांचा प्रवास याठीकाणीच थांबला नाही.तर या दाम्पत्यांची तळमळ लक्षात घेवून एम.के.सी.एल कडुन त्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली.त्यात एमएससीआयटीचे प्रशिक्षण देणारे केंद्र त्यांना मंजूर करण्यात आले.या केद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक युवक युवतींना शास्त्रशुध्द शिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी त्यांनी प्राप्त करून दिल्या आहेत.या सर्व प्रवासात त्या नेहमी आपल्या पतीच्यासोबत सावली सारख्या राहील्या,पती सावंत-भोसले यांनी कोणताही निर्णय घेतल्यानंतर तो यशस्वी होण्यासाठी त्या दोघांनी मोठे कष्ट केले.विशेष म्हणजे श्री.सावंत-भोसले यांचे नॉलेज सिटी उभारायची आणि अनेक मुलांना उच्च शिक्षणाचे धडे द्यायचे,हे त्यांचे स्वप्न होते.आणि त्याच्या जोरावर श्री.सावंत-भोसले यांनी स्थापन केलेल्या भोसले नॉलेज सिटीच्या त्या अविभाज्य घटक बनल्या.आणि सावंतवाडीत पाॅलिटेक्निक आणि फार्मसीसह अनेक शिक्षणक्रम सावंतवाडीत सुरू केले.आज सलग सहाव्यावर्षी त्या संस्थेच्या एक यशस्वी चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.संस्थेचे मोठे पद असताना सुध्दा त्यांनी पुढील शिक्षण घेण्याची तयारी दाखविली असून वकीली परिक्षेत सुध्दा त्यांनी यश संपादन केेले आहे.त्यांचा हा अनोखा प्रवास आजच्या आधुनिक जगात जगणार्‍या तसेच नोकरी धंदयाच्यामागे धावणार्‍या महिलांना प्रेरणा देणारा आहे.

11

4