पोलिस अधिकारी दाम्पत्याने साकारली सावंतवाडीत “किल्ले प्रतापगडाची” प्रतिकृती…

2

 

युवा पिढीला दिला वेगळा आदर्श; खाकीच्या पलीकडे जावून इतिहासाची जनजागृती…

सावंतवाडी ता.१८: पोलिस खात्यात काम करणे म्हणजे धावपळीचे जीवन आणि त्यातही अधिकारी म्हटल्यानंतर घडाळ्याच्या काट्यावरचा प्रवास,अशा परिस्थिती सुध्दा शिवाजी महाराजांप्रती असलेला प्रचंड आदर आणि कोकणीपण जपत सावंतवाडी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अण्णासो बाबर आणि स्वाती यादव या पोलिस दांम्पत्याने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कील्ले प्रतापगडची प्रतिकृती साकारत युवा पिढीला संदेश दिला आहे.धावपळीच्या जीवनात एखाद्या अधिकार्‍याने आपले नेहमीचे काम बाजूला सारुन रात्री तीन साडे तीन वाजे पर्यत जागून त्यांनी आपल्या राहत्या घरासमोर ही प्रतिकृती साकारली आहे.यात त्यांना त्यांच्या सहा वर्षाच्या चिमुकल्या अर्थव या मुलाने ही मदत केली आहे.
याबाबतची माहीती देताना श्री. बाबर म्हणाले,आम्ही कील्ले प्रतापगड तयार केला आहे.त्यात महाराजांच्या काळात असलेल्या सर्व गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यात मुख्य प्रवेशव्दारे टेहळणी बुरूज,भवानी मातेचे मंदीर,नगारखाना आदी सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आजच्या मोबाईल मध्ये अडकलेल्या युवा पिढीला याचा आदर्श घेता येईल,यासाठी आम्ही हा वेगळा उपक्रम राबविला आहे.

37

4