खोट्या तक्रारीवरून फिर्यादीना न्यायालयाने फटकारले…

2

 

तारकर्ली पायवाट वाद प्रकरण ; संशयितांची जामिनावर मुक्तता…

मालवण, ता. १५ : तारकर्ली रांजेश्वर येथे तारेचे कुंपण घातल्याचा विषयावरून महिलांच्या दोन गटात हाणामारी प्रकरणी अटकेत असलेल्या सहाही संशयितांची प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.
दरम्यान दोन्ही तक्रारदारांनी आपल्या सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरल्याचा आरोप केला होता. मात्र आज दोन्ही तक्रारदारांनी आमच्या वस्तू आमच्याकडे असल्याचे सांगितले. यावरून न्यायालयाने संबंधितांना चांगलेच खडे बोल सुनावले.
दीप्ती तारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी उमा बापूजी चव्हाण, लक्ष्मी बापूजी चव्हाण, कमलाकांत सुनील चव्हाण सर्व रा. वायरी बांधवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. तर उमा चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दीप्ती प्रकाश तारी, एकता प्रकाश तारी, सुप्रिया शांताराम करंगुटकर सर्व रा. रांजेश्वर तारकर्ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. सर्व सहा आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक भारत फार्णे, मंगेश माने अधिक तपास करत आहेत.

110

4