आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा ६ मार्चला…

1657
2

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा मर्यादित स्वरूपात ; आंगणे कुटुंबीयांची माहिती…

मालवण, ता. २९ : आंगणेवाडीतील श्री देवी भराडीची यात्रा ६ मार्च २०२१ ला होणार आहे. यावेळची यात्रा ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या उपस्थितीत मर्यादित स्वरुपात पार पडणार आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबीयांनी दिली.
भाविकांच्या होणाऱ्या गैरसोय बद्दल आम्ही दिलगीर आहोत, भाविकांनी आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून श्री देवी भराडी मातेस आपले सांगणे सांगावे, आई भराडी माता आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल, असे आंगणे कुटुंबीयांनी म्हटले आहे.

4