शिधापत्रिकेच्या नावावर ससेहोलपट करू नका..

2

संजू परब,अक्रम खान यांची मागणी; सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन…

बांदा,ता.२५:
शासनाच्या बोगस शिधापत्रिका शोध मोहिमे अंतर्गत नागरिकांना शिधापत्रिका परिपूर्ण करण्यासाठी महसूल खात्याकडून कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी सर्व शिधापत्रिका धारकांनी आवश्यक कागदपत्रे यांची पूर्तता शासनमान्य रास्त दुकानात केली आहे. नागरिक कोरोनामुळे आधीच त्रस्त झाले असून नागरिकांची साहेहोलपट थांबवावी अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान व नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना कालावधीत दरडोई उत्पन्नात घट झाली आहे. नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अशा परिस्थितीत लोकांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिका हा एकमेव आधार आहे. मात्र आपल्या खात्याकडून सातत्याने होणाऱ्या कागदपत्रांच्या मागणीमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. स्थानिकांची कागदपत्रांसाठी होणारी वणवण थांबावी यासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
तहसीलदार म्हात्रे यांनी यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

15

4