कुडाळ-सावंतवाडीत तालुक्यात रात्री अवकाळी पावसाची हजेरी…

2

कुडाळ ता.२८: शहरासह सावंतवाडी तालुक्यात काल रात्री अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे परिसरातील तसेच बऱ्याच ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर अचानक पाऊस दाखल झाल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गाची चांगलीच धावपळ झाली.
आज सकाळ पासून उष्णतेचा पारा वाढला होता .त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत होती. दरम्यान ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने आपली हजेरी लावली. मात्र कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे आधीच संकटांचा सामना करणारा शेतकरी आणखीनच चिंतेत सापडला आहे.

20

4