विलवडे-फोैजदारवाडी येथील महेश कृष्णा मेस्त्री यांचे निधन…

2

 

बांदा,ता.२६: विलवडे-फोैजदारवाडी येथील महेश कृष्णा मेस्त्री (वय ४४), यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरी निधन झाले.चार दिवसांपूर्वीच महेश यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यामुळे मेस्त्री कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महेश यांचा बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात पान स्टॉल आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, भावजय, चुलत भाऊ, पुतणे असा परिवार आहे. चार दिवसांपुर्वी त्यांची आई सुंदरी कृष्णा मेस्त्री (वय ८०), यांचे वृध्दापकाळाने निधन झाले होते. महेशच्या आकस्मिक निधनाने कुटंबावर मोठे संकट ओढवले आहे. बांदा येथील फर्निचर दुकानचे मालक संतोष मेस्री यांचे महेश हे भाऊ होत. आई व मुलाच्या अकाली निधनाने विलवडे गावावर शोककळा पसरली आहे.

5

4