सावंतवाडी तालुक्यात आज १५१ जण कोरोना पॉझिटिव्ह…

2

 

शहरात ३० तर ग्रामीण भागात १२१ रुग्ण ; सद्यस्थितीत ६२७ जणांवर उपचार सुरू…

सावंतवाडी,ता.२६: तालुक्‍यात आज तब्बल १५१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील ३०,तर ग्रामीण भागातील १२१ जणांचा समावेश आहे,याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी शिरोडकर यांनी दिली. आतापर्यंत सावंतवाडी तालुक्यात ३ हजार ४२१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यातील २६६२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ६२७ जणांवर उपचार सुरू आहेत.

11

4