वेंगुर्लेत भाजपकडून नुकसानग्रस्तांना ताडपत्री-पाण्याच्या टाक्याचे वाटप सुरू…

2

वेंगुर्ले,ता.२६:  तौक्ती चक्रीवादळात किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची वाट पायाला लागू नये यासाठी सामाजिक जाणिवेतून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने मदतीचा हात पुढे केला आहे. आज वेंगुर्ले शहरात प्राथमिक स्वरूपात नुकसानग्रस्त ग्रामस्थांना ताडपत्री, पाण्याच्या टाक्या यांचे वाटप भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते सुरू करण्यात आले आहे.
चक्री वादळामध्ये नुकसान झालेल्या अनेकांची घरे अजून दुरुस्त करण्याचे काम चालू आहे. पावसामुळे घरात चिखल झालेला आहे. त्या सर्वांचा विचार करून तात्काळ स्वरूपात ताडपत्रीचे वाटप तसेच पाण्याच्या सोयीसाठी पाण्याच्या टाक्या वाटप करण्यात येत आहे. हे वाटप तालुक्यात नुकसानग्रस्त ग्रामस्थांत पर्यंत करण्यात येणार आहे, तसेच अजूनही मदत मुंबई भाजप कडून येत आहे त्याचे वाटप करण्यात येईल असे यावेळी श्री. तेली यांनी सांगितले.
या वाटपा वेळी वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा प्रदेश सदस्य शरदजी चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती निलेश सामंत, सुरेंद्र चव्हाण, जयंत मोंडकर, वसंत तांडेल, सुषमा खानोलकर, प्रार्थना हळदणकर, विजय नाईक वेतोरे, परबवाडा सरपंच पपू परब, साईप्रसाद नाईक, दादा केळुसकर, धर्मराज कांबळी,बाबली वायगणकर, प्रशांत आपटे, शंकर घारे, बाळू प्रभू, मनवेल फर्नांडिस, लक्ष्मीकांत करपे, श्रीकृष्ण धानजी, संतोष अनसुरकर, महादेव नाईक, प्रशांत खानोलकर, राहुल नाईक, संदीप पाटील, विनय गोरे, पुंडलिक हळदणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

1

4