सावंतवाडीतील स्वॅब टेस्टिंग सेंटरकडे होमगार्ड नेमा…

2

महेंद्र सांगेलकर ; सावंतवाडी काँग्रेसची तहसीलदार म्हात्रेंकडे केली मागणी

सावंतवाडी,ता.२७: येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात स्वॅब टेस्टसाठी येणाऱ्या व्यक्ती या परिसरात न थांबता इतरत्र फिरत असतात.त्यामुळे त्याचा संसर्ग अन्य लोकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ होमगार्ड नियुक्त करण्यात यावेत, अशी मागणी सावंतवाडीचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.यात त्या ठिकाणी विश्रामगृहावर येणारे व्यक्ती बिनधास्त इतरत्र फिरत आहेत,असे त्यांनी म्हटले आहे.

1

4