गौतम बुद्ध आणि भारतत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती ऑनलाईन पध्दतीने साजरी…

2

वैभववाडी,ता.२७: खांबाळे बौद्ध विकास मंडळ, ग्रामिण, मुंबई,महिला मंडळ आणि युवा शिलेदार यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध आणि भारतत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झूम अॕपद्वारे उत्साहात संपन्न झाली.
यावेळी ग्रामिण आणि मुंबई शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद, महिला मंडळ युवा,ऑनलाईन उपस्थित होते.
मुंबई मंडळाचे सचिव आयु. महेंद्र खांबाळेकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडून अध्यक्ष निवड करत कार्यक्रमाची सुरुवात केली तर ग्रामीण मंडळाचे आयु. रूपेश कांबळे यांनी मंडळाच्या वतीने त्याला अनुमोदन दिले. मुंबई मंडळाचे अध्यक्ष आयु.बाळकृष्ण भिकाजी कांबळे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून पुढील कार्यक्रम ग्रामिण मंडळाचे सचिव आणि उपासक आयु. मंगेश कांबळे यांच्याकडे कार्यक्रमाची सूत्रे दिली त्यांनी बुद्ध पूजापाठ घेतला.
कार्यक्रमात पुढे खांबाळे बौद्ध विकास मंडळाचे सभासद आयु.प्रा.रविचंद्र कांबळे यांनी बौद्धधम्म आणि आजची युवा पिढी या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले. आणि मंडळाच्या महिला सभासद सौ प्राची प्रभाकर कांबळे यांनी आँनलाईन शिक्षण पद्धती आणि मुलांची मानसिकता या विषयावर यांनी देखील उत्तम मार्गदर्शन केले. मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे निकाल प्रत्येक स्पर्धा समन्वयकांनी जाहीर केले. तसेच मंडळाच्या युवा वर्गाच्या वतीने कु.स्वप्नाली कांबळे हिने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण कांबळे यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात युवकांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मंडळाचे युवा सभासद आयु. रोहन कांबळे यांनी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली त्या सर्व देणगीदार सभासदांचे आणि हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि सभासदांचे आभार व्यक्त केले.
अध्यक्षांच्या परवानगीने ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मुंबई अध्यक्ष महेंद्र खांबाळेकर यांनी कार्यक्रमाचा समारोप करुन कार्यक्रमाची भरभरुन उत्साहात आणि अमाप उपस्थितीत सांगता झाली.

_विविध स्पर्धांचे निकाल खालील प्रमाणे_

चित्रकला स्पर्धा लहान गट- तनिष्का अजित जाधव-प्रथम क्रमांक, किरण प्रभाकर कांबळे-द्वितीय क्रमांक, श्रेयस संतोष कांबळे-तृतीय क्रमांक

मोठा गट- पार्थ हरिश्चंद्र जाधव-प्रथम क्रमांक, रोहित रामचंद्र कांबळे-द्वितीय क्रमांक, शुभम बाळकृष्ण कांबळे-तृतीय क्रमांक

वक्तृत्व स्पर्धा लहान गट- किरण प्रभाकर कांबळे-प्रथम क्रमांक, स्वरुप सुनिल कांबळे-द्वितीय क्रमांक, तन्मय मंगेश कांबळे-तृतीय क्रमांक

मोठा गट- संस्कृती संतोष कांबळे-प्रथम क्रमांक सोहम प्रदिप कांबळे- द्वितीय क्रमांक, शुभम बाळकृष्ण कांबळे- तृतीय क्रमांक

निबंध स्पर्धा लहान गट- तन्मय मंगेश कांबळे-प्रथम क्रमांक, किरण प्रभाकर कांबळे-द्वितीय क्रमांक, तनिष्का अजित जाधव- तृतीय क्रमांक

मोठा गट- आकांक्षा संजय कांबळे- प्रथम क्रमांक, कृतिका बाळकृष्ण कांबळे-द्वितीय क्रमांक, आम्रपाली रविंद्र कांबळे- तृतीय क्रमांक

बुद्धभीम-गीतगायन-लहान गट- राज अरुण कांबळे-प्रथम क्रमांक, किरण प्रभाकर कांबळे-द्वितीय क्रमांक, प्रज्ञा अनिल कांबळे- तृतीय क्रमांक*

मोठा गट- तन्वी अजय कांबळे- प्रथम क्रमांक, शुभम बाळकृष्ण कांबळे – द्वितीय क्रमांक, रोहित रामचंद्र कांबळे- तृतीय क्रमांक,

_स्पर्धेचे समन्वयक आणि परिक्षक_

चित्रकला- प्राची कांबळे, स्वप्नाली कांबळे, वक्तृत्व स्पर्धा- रुपेश कांबळे, रोहन कांबळे
बुद्ध-भिम गीत गायन स्पर्धा- महेंद्र खांबाळेकर, तुषार कांबळे, शितल कांबळे , निबंध स्पर्धा- प्रा.अजित जाधव, राहुल कांबळे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राहूल कांबळे, रोहन कांबळे, तुषार कांबळे, स्वप्नाली कांबळे, निखिल कांबळे, प्रियंका कांबळे, फाल्गुनी जाधव आणि सर्व युवक युवती यांनी विशेष मेहनत घेतली. महेंद्र खांबाळेकर,अजित जाधव,
मनस्वी कांबळे यांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले.

2

4