निर्बंध शिथिल होईपर्यंत खरेदीसाठी झुंबड करू नये…

2

सुरेश भोगटे; दिलेल्या मुदतीत खरेदीसाठी बाहेर पडा…

सावंतवाडी,ता.२७: कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार खरेदीसाठी बाजारात येण्याचे नागरिकांनी आपले नियोजन करून संक्रमण रोखण्यासाठी प्राधान्य द्यावे.तसेच निर्बंध शिथिल होईपर्यंत खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात झुंबड करू नये,पोलिसांना नाहक त्रास देऊ नये,असे आवाहन माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केले आहे.
दरम्यान अकरा वाजेपर्यंत दुकाने चालू आहेत, म्हणून आपण साडेदहा अकराला खरेदीसाठी न जाता सकाळी लवकर नागरिकांनी खरेदी करणे गरजेचे आहे. आठ किंवा नऊ वाजता खरेदीसाठी प्रत्येकाने आपापले नियोजन केले तर दुकानदारांसाठी सुद्धा सोयीचं होईल, गर्दी झुंबड थांबेल, तसेच कोरोना संक्रमण रोखण्यास मदत होईल यासाठी सर्वांनी सुरक्षित रहा गर्दी होणार नाही.याची काळजी घ्या तसेच कुठल्याही कार्यवाही पासून दुसऱ्याला व पोलिसांना नाहक त्रास होऊ नये असे सहकार्य करा,असेही त्यांनी म्हटले आहे.याबाबत त्यांनी पप्रसिद्धीपत्रक दिले आहे.

0

4