“सिंधुदुर्ग बेस्ट मॉडेल” स्पर्धेत बांद्याचा नील बांदेकर प्रथम…

2

कुडाळ किड्स मॉडेलिंगचे आयोजन; १४ वर्षाखालील मुलांसाठी होती स्पर्धा…

बांदा ता.२७:  येथील “किड्स मॉडेलिंग” यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या
“सिंधुदुर्ग बेस्ट मॉडेल” या स्पर्धेमध्ये बांदा केंद्र शाळेचा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.ही स्पर्धा १४ वर्षाखालील सर्व मुलामुलींसाठी खुली होती.
स्पर्धेत विद्यार्थ्यांचा स्टायलिश फोटो ,त्यांचे लुक, तसेच भाषण शैली यावर निवड केली गेली गेली.नील ने आजवर अनेक स्पर्धांमध्ये विविध प्रकारचे यश संपादन केलेले आहे या वेगळ्या धाटणीच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून त्याने आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सदर स्पर्धेचे आयोजन शेखर सातोस्कर आणि कोरिओग्राफर रवी कुडाळकर यांनी केले होते.

1

4