बांदा शहरात सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी…

2

बांदा,ता.२७:सोसायटी फॉर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट व प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल- कणकवली व बांदा ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून बांदा शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. ग्रामपंचायत येथे सरपंच अक्रम खान यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, शामसुंदर मांजरेकर, साईप्रसाद काणेकर, राजेश विरनोडकर, किशोरी बांदेकर, संस्थेचे अध्यक्ष संदिप चौकेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सरपंच अक्रम खान यांनी शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरणे टाळावे. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शहरातील बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारपेठ, पोलीस ठाणे, बांदेश्वर मंदिर, ग्रामपंचायत व वर्दळीच्या नागरी वस्तीत व स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार खासगी ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांकडून प्राणजीवन सहयोग संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

1

4