भाजपच्या तीनही कोविड सेंटरला जिल्हाधिकार्‍यांची मंजूरी..

2

राजन तेलींची माहीती ; ऑक्सिजन व्हेंटिलेटरसह अन्य सामग्री पुरवण्याची जबाबदारी…

ओरोस ता.२७: जिल्हा भाजपाच्यावतीने तीनही विधानसभा मतदारसंघात उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरसाठी आवश्यक असलेली मंजुरी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी दिली आहे.अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.दरम्यान त्या ठिकाणी ऑक्सिजन-व्हेंटिलेटरची सोय आणि आवश्यक असलेली यंत्रसामग्री स्वतः भाजप पुरविणार आहे.त्याचा फायदा जिल्ह्यातील लोकांना होणार असून प्रत्येक केंद्र हे ३५ खाटांचे असेल,असेही ते म्हणाले.

 

कणकवली-देवगड-वैभववाडी मतदार संघात देवगड ग्रामीण रुग्णालय, कुडाळ-मालवण मतदार संघात मालवण कुंभारमाठ येथील पॉलिटेक्निक येथील कोविड केअर सेंटर नजिक आणि सावंतवाडी-वेंगुर्ले-दोडामार्ग मतदार संघात सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद विद्यालय येथे ही तिन्ही सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी ऑक्सीजन, व्हेन्टीलेटर, डॉक्टर यांच्यासह सर्व साहित्य भाजप पुरवीणार आहे, असे यावेळी तेली यानी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

0

4