तौक्ते वादळाच्या नुकसान भरपाईपोटी सिंधुदूर्गच्या जनतेला साडे चाळीस कोटी देणार…

2

पालकमंत्री उदय सामंतांची माहीती; घर-गोठयांच्या नुकसान भरपाईचा आकडा वाढवला…

सावंतवाडी ता.२७: तौक्ते वादळाच्या पार्श्वभूमिवर झालेल्या नुकसानग्रस्तांना भरघोस मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.यात कोकणसाठी ४५२ कोटी तर सिंधुदूर्गसाठी साडे चाळीस कोटी अठरा लाख रुपयाची भरीव मदत देण्यात येणार आहे.तर शासकीय आणि अन्य नुकसानीची मदत वेगळी आहे.कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,याची खबरदारी घेण्यात येणार आहे,अशी माहीती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.दरम्यान जुन्या निकषानुसार मिळणारी भरपाई ही कमी होती.परंतू महाविकास आघाडीने सर्वांची काळजी घेवून ही भरपाई वाढवून दिली आहे.यात घर व गोठ्यांच्या नुकसान भरपाईचा आकडा वाढवला आहे.त्यामुळे त्याचा फायदा सर्वच नुकसानग्रस्तांना होणार आहे,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

2

4